पनवेल : सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचा पदभार स्विकारल्यापासून सिडको हद्दीतील परिसरात विविध सुविधा देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सिडकोच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरी सुविधा देण्याचे काम झपाट्याने होत असून जवळपास १०० कोटी रुपयांची विकासकामे पनवेल महापालिका हद्दीत होणार आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून सिडको परिसरात विकासाला वेग आला आहे. त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका हद्दीतील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी १०० कोटी रुपयांच्या विकासकामांना सुरुवात होत आहे. त्यामुळे सिडको हद्दीत येणाऱ्या नवीन पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा येथील नागरी सुविधा मजबूत होणार आहेत. त्यानुसार रस्ते, पदपथ, गटारे, पाणी पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. नवीन पनवेल मधील सेक्टर १ ते ११ (पूर्व) मध्ये पदपथ दुरुस्तीसाठी ८ कोटी ५३ लाख ५८ हजार रुपये, नवीन पनवेल मधील सेक्टर १ ते ११ (पूर्व) मध्ये रस्ते दुरुस्तीसाठी ९ कोटी २५ लाख ३४ हजार रुपये, नवीन पनवेल मधील सेक्टर १ ते १८ (पश्चिम )मध्ये पदपथ दुरुस्तीसाठी ६ कोटी ५४ लाख ९९ हजार रुपये, सेक्टर २ ते ६, सेक्टर ११ व १२ आमी सेक्टर १४ ते १७ (पूर्व) मधील रस्ते दुरुस्तीकरिता ९ कोटी ९५ लाख ४२ हजार रुपये, सेक्टर १२ ते १९ (पूर्व ) येथील गटार व पदपथ कामासाठी ८ कोटी ५७ लाख ९९ हजार रुपये, सेक्टर ०३, सेक्टर १२ व सेक्टर १६ (पूर्व) मधील अतिरिक्त पाणी पुरवठ्यासाठी १ कोटी ५० लाख, सेक्टर ११ (पूर्व ) मध्ये इएसआर दुरुस्तीसाठी ०२ कोटी, नवीन पनवेलमधील गार्डन आणि मैदानाची दुरुस्ती तसेच खेळणी साहित्यकृती ४० लाख ८२ हजार रुपये, काळुद्रे येथिल रस्ते, गटार व पदपथसाठी १ कोटी ७८ लाख ७० हजार रुपये, नवीन पनवेलमधील सिडको फायर स्टेशन तसेच स्टाफ क्वार्टर्स, विभागीय ईमारत व पंप हाऊस दुरुस्तीसाठी २ कोटी १३ लाख ९० हजार रुपये, तळोजा पाचनंद फेज १ मधील सेक्टर २,४,५,७,८,९,१०,११ आणि १७ येथील रस्ते, पदपथ, गटार आदी कामासाठी १ कोटी ३२ लाख ३८ हजार, खारघर सेक्टर २ ते ११ मधील रस्ते व पदपथ दुरुस्तीसाठी ६२ लाख ४७ हजार, खारघर सेक्टर ३ मधील पदपथ आणि सबवे मधील रस्ता दुरुस्तीसाठी ३२ लाख १९ हजार, खारघरमधील सेक्टर १ ते ११ मधील तसे व पदपथ दुरुस्तीकरिता ३ कोटी ५० लाख, कामोठेमधील सेक्टर ५ ते १२, १४, २४, आणि ३१ ते ३६ मधील रस्ते, पदपथ, गटारे, बगीचे व मैदानाच्या विकासासाठी ११ कोटी २७ लाख रुपये, कळंबोली मधील सेक्टर १ ते २३ आणि इ ते १६ इ मध्ये रस्ते, पदपथ, गटार, उघड्या भूखंडावरील मलबे काढणे आदी कामासाठी १० कोटी ६८ लाख, खारघरमधील सेक्टर १२ ते २१ रस्तेपदपथ, गटारे, सेक्टर १६ व १७ मधील सर्व्हिस रॉड, सेक्टर १२ ते १८ . गटारे दुरुस्त करण्याच्या कामासाठी १२ कोटी ७५ लाख, सेक्टर १२ मधील कम्युनिटी सेंटरच्या दुरुस्तीसाठी ४१ लाख ७५ हजार, खारघरमध्ये सेक्टर १४ येथे गॅस शवदाहिनीसाठी १ कोटी ५४ लाख, सेक्टर १४ मधील तलावाच्या सुशोभिकरणासाठी १ कोटी ६४ लाखसेक्टर १४ मध्ये हिंदू स्मशानभूमीसाठी ११ लाख ६५ हजार, सेक्टर १२ ते २१ मधील गतिरोधक व झेब्राक्रॉसिंगला थर्मोप्लास्टिक रंग लावण्यासाठी ११ लाख १३ हजार रुपये खर्च करण्यात येणार असून एकूण १०० कोटी रुपयांची विकासकामे महापालिका हद्दीतील सिडको वसाहतींमध्ये होणार आहे.
सिडकोच्या माध्यमातून पनवेल महापालिका हद्दीत होणार १०० कोटी रुपयांची विकासकामे